• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार ; आरक्षण समितीचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा..

Admin by Admin
November 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार ; आरक्षण समितीचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पलूस : अंमलबजावणीसाठी सरकारने ५० दिवसांचा वेळ मागितला होता. परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला दिलेली मुदत संपल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन द्यावे, असे आवाहन धनगर समाजाला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पलूस तालुका धनगर आरक्षण समितीच्या वतीने तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला.तहसील कार्यालयासमोर तहसीलदार निवास ढाणे यांना धनगर कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, धनगर समाजाच्या उद्धारासाठी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा. मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करा व योजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करा. जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही. त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करा. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे .धनगर समाज देवस्थानाच्या सर्वांगिण विकासासाठी २०० कोटी रूपयांचा निधी द्यावा.तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे आदी मागणी करण्यात आली.

आंदोलनात हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेना अध्यक्ष ऋषी टकले ,माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, बुर्लीचे उपसरपंच उमेश पाटील, पलूस तालुका शिवसेना अध्यक्ष प्रशांत लेंगरे, तुकाराम धायगुडे, प्रमोद पुजारी, नितीन एडके, सागर हजारे, मोहन टकले, प्रमोद थोरात, अशोक पाटील यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

ढोलाच्या आवाजाने परिसर दणाणला
आंदोलनाची सुरुवात पलूस पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. यावेळी धनगरीत ढोलाच्या दणदणाटात तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला. यावेळी धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा आंदोलन ठिकाणी निषेध करण्यात आला. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं ही घोषणा देण्यात आली.

राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्त्वात आहे. डोंगरदऱ्यात राहणारे, भटकंती करुन उपजिवीका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत. कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत. गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली.–कुंडलिक एडके, माजी जिल्हा परिषद सदस्य

मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात, ते सर्वसमावेशक आहेत. एका विशिष्ट समुदायासाठी ते खास प्रयत्न करत असून धनगर आरक्षणाकडे त्यांची उदासीनता दिसून येते.मुख्यमंत्र्यांनी तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा समाजाच्या संविधानिक तीव्र लढ्याला सरकारला सामोर जावं लागेल.
– ऋषी टकले , अध्यक्ष हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना

Previous Post

पोलीस दलात खळबळ | अर्धा तास उशीरा पोहोचल्यानं न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा, पोलीस अधीक्षकांनी दिलं वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र

Next Post

ब्रेकिंग | ऊस आंदोलनाची तीव्रता वाढणार ; सरकारसाेबती ऊस दराची चर्चा ठरली निष्फळ..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | ऊस आंदोलनाची तीव्रता वाढणार ; सरकारसाेबती ऊस दराची चर्चा ठरली निष्फळ..

ब्रेकिंग | ऊस आंदोलनाची तीव्रता वाढणार ; सरकारसाेबती ऊस दराची चर्चा ठरली निष्फळ..

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group