• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस दलात खळबळ | अर्धा तास उशीरा पोहोचल्यानं न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा, पोलीस अधीक्षकांनी दिलं वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Court Punished To Police : पोलीस दलात खळबळ : मानवत पोलीस ठाण्याचे हवालदार आणि शिपाई अर्धातास उशीरा न्यायालयात अहवाल घेऊन पोहोचले. त्यामुळे न्यायालयात अर्धातास उशीरा आलेल्या पोलिसांना न्यायाधीशांनी गवत काढण्याची शिक्षा दिली.

न्यायालयात अर्धा तास उशीरा पोहोचलेल्या दोन पोलिसांना न्यायालयानं गवत काढायची शिक्षा ठोठावल्यानं मोठी खळबळ उडाली. ही शिक्षा परभणी इथल्या न्यायालयानं ठोठावली आहे. मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपायाला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायाधीशांनी मानवत पोलीस ठाण्याच्या हवालदार आणि शिपायाला न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाला म्हणून गवत काढण्याची शिक्षा ठोठावली होती. ती पोलीस कर्मचाऱ्यांनी भोगलीही आहे. मात्र रात्री गस्तीवर असताना पोलिसांना न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाला होता. पोलिसांनी पकडलेल्या संशयितास 24 तासात न्यायालयात हजर करावं लागते. त्यामुळे रात्री गस्तीवर असतानाही मानवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी संशयिताला घेऊन न्यायालयात पोहोचले. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र देण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनाही पत्र दिलं आहे. – रगसुधा आर, जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी

काय आहे प्रकरण : मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपाई 22 ऑक्टोबरला रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांनी रात्री मानवत इथं दोन संशयिताना संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं होतं. त्याची नोंद त्यांनी पोलीस ठाण्याच्या डायरीत घेतली होती. ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक असते. त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यानं पोलिसांनी न्यायाधीशांची वेळ घेतली. यावेळी न्यायालयानं सकाळी अकरा वाजताची वेळ दिली होती. मात्र रात्री कर्तव्यावर असल्यानं पोलिसांना सकाळी न्यायालयात या पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी पोलिसांना उशीरा न्यायालयात आल्यानंतर चांगलचं खडसावलं.

न्यायालयानं ठोठावली गवत काढण्याची शिक्षा : पोलीस हवालदार आणि शिपाई न्यायालयात अर्धा तास उशीरा दाखल झाले. न्यायालयात अर्धा तास उशीरा आलेल्या पोलिसांमुळे न्यायाधीशांनी जाब विचारला. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना गवत काढण्याची शिक्षा ठोठावली. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना गवत काढण्यासाठी विळे आणून दिले. त्यामुळे पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायानं न्यायालय परिसरातील गवत काढून न्यायाधीशांनी ठोठावलेली आपली शिक्षा पूर्ण केली. मात्र रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशीर झाल्यानं गवत काढण्याची शिक्षा केल्यानं पोलीस वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

वरिष्ठ न्यायाधीशांना दिलं पत्र : पोलिसांनी 22 ऑक्टोबरच्या रात्री गस्तीवर असताना दोन संशयित व्यक्ती आढळून आले होते. त्यामुळे मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. संशयास्पद व्यक्ती असल्यानं पोलिसांनी त्यांना भादंवी 122 नुसार पोलीस डायरीवर नोंद घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी केली. मात्र सुट्याचा कालावधी असल्यानं पोलिसांनी न्यायाधीशांचा वेळ घेतला. न्यायाधीशांनी त्यांना सकाळी 11 वाजताचा वेळ दिला. पण रात्री गस्तीवर असल्यानं पोलिसांना सकाळी न्यायालयात जाण्यास अर्धातास उशीर झाला. त्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी त्यांना गवत काढण्याची शिक्षा दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षा भोगल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक रगसुधा आर यांनी वरिष्ठ न्यायाधीशांना याप्रकरणी पत्र दिलं आहे. त्यासह त्यांनी उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनाही याबाबत पत्र दिल्याचं गोपनीय खबऱ्याला सांगितलं आहे.

Previous Post

लोकसभा इलेक्शन | सदाभाऊ खोत लोकसभेसाठी ‘या’ मतदार संघात उडी मारणार..!

Next Post

पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार ; आरक्षण समितीचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार ; आरक्षण समितीचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा..

पलूसमध्ये धनगर आरक्षणासाठी एल्गार ; आरक्षण समितीचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group