कोल्हापूर : मागील वर्षी तुटलेल्या उसाचे ४०० रुपये आणि चालू हंगामात ऊसाला ३५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्र्यासाेबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार आहे. याबाबत संघटनेचे राज्य अध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, दोन तास सहकार मंत्र्यासोबत चर्चा झाली. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी शासन शेतकऱ्यांसोबत आहे, असा शब्द दिला होता, मात्र बैठकीत सरकार तसे वाटले नाही. जे कारखाने थकबाकी देणार आहेत. त्या कारखान्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी होती.
दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन- जालिंदर पाटील
सहकारमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. मागील वर्षाचे काही मागू नका. यावर्षी दरवाढ करु, असे कारखानदारांचं म्हणणे आहे. मागच्या वर्षीच्या दुसऱ्या उचलीतील ४०० रुपये आम्ही मागत आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केल जाईल. दिल्ली सारख आंदोलन होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

