• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लोकसभा इलेक्शन | सदाभाऊ खोत लोकसभेसाठी ‘या’ मतदार संघात उडी मारणार..!

Admin by Admin
November 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
लोकसभा इलेक्शन | सदाभाऊ खोत लोकसभेसाठी ‘या’ मतदार संघात उडी मारणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : महाविकास आघाडीकडे या घडीला तरी सक्षम पर्याय दिसत नाही. अशा वेळी सदाभाऊंनी या मैदानात ताकद आजमावण्याचे ठरवले आहे.

‘हातकणंगले लोकसभा मतदार संघातून लढणार, हे शंभर टक्के नक्की आहे.माझ्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत,’ अशी भूमिका माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी ‘गोपनीय खबऱ्या‘शी बोलताना मांडली.

खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना आव्हान दिले आहे. ‘गेल्या हंगामातील उसाला ४०० रुपये अंतिम हप्ता आणि चालू हंगामातील उसाला ३५०० रुपये पहिली उचल मिळवून देण्यात राजू शेट्टी यशस्वी झाले, तर लोकसभा लढण्याचा विचार सोडेन,’ असे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत श्री. खोत यांची भूमिका जाणून घेतली.

महायुती आणि विशेषतः भाजपसमवेत गेली काही वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर सदाभाऊंची कोंडी झाली आहे. त्यांच्या संघटनेला भाजपकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे या वेळी गरज पडली तर भाजपला अंगावर घेण्याची तयारी त्यांनी केली. ‘सन २०१९ च्या लोकसभेला धैर्यशील माने यांच्या विजयात सदाभाऊंचा महत्त्वाचा वाटा राहिला होता.

आता माझ्यासाठी हातकणंगले मतदारसंघातील सगळे पर्याय खुले आहेत,’ असे सदाभाऊंनी स्पष्ट केले आहे. हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मैदानात असतील. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली जाईल का? शिंदे गट नवा चेहरा शोधेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भाजपकडून माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल तयारी करत आहेत.

महाविकास आघाडीकडे या घडीला तरी सक्षम पर्याय दिसत नाही. प्रतीक जयंत पाटील यांना मैदानात उतरावयाचे ठरले तर नवे आव्हान उभे राहू शकते. अशा वेळी सदाभाऊंनी या मैदानात ताकद आजमावण्याचे ठरवले आहे. माढा लोकसभा मतदार संघातून सन २०१४ ला निसटता पराभव झालेले सदाभाऊ पुढे विधान परिषद आमदार, राज्यमंत्री झाले.

Previous Post

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत झाली ‘ही” चर्चा..

Next Post

पोलीस दलात खळबळ | अर्धा तास उशीरा पोहोचल्यानं न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा, पोलीस अधीक्षकांनी दिलं वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

पोलीस दलात खळबळ | अर्धा तास उशीरा पोहोचल्यानं न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा, पोलीस अधीक्षकांनी दिलं वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group