• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगींना”…वाचा सविस्तर..!

Admin by Admin
November 21, 2023
in क्राईम, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
“पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगींना”…वाचा सविस्तर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

PM मोदींसह CM योगींना बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, आरोपी गजाआड..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला.

फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सातत्याने धमकीचे फोन तसेच ई-मेल येत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आरोपीने दिली.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने जे जे रुग्णालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या आरोपीने मी कुख्ख्यात गुंड दाऊड इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला. त्यानंतर चुनाभट्टी परिसरातून एका २९ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. कामरान खान, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने ही धमकी नेमकी कोणत्या उद्देशाने दिली. याचा तपास आझाद मैदान पोलिस करीत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता.? माहिती अधिकारातून माहिती प्राप्त !

Next Post

मिरजेत मानधन काढण्यास आठ हजारांची लाच घेताना महापालिकेचा मुकादम जाळ्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
एपीआय शिंदेंची कर्तबगारी ; खून प्रकरणातील फरार आरोपीला जेलची वारी..!

मिरजेत मानधन काढण्यास आठ हजारांची लाच घेताना महापालिकेचा मुकादम जाळ्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group