• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत मानधन काढण्यास आठ हजारांची लाच घेताना महापालिकेचा मुकादम जाळ्यात

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
एपीआय शिंदेंची कर्तबगारी ; खून प्रकरणातील फरार आरोपीला जेलची वारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात १२ हजारांच्या लाचेची मागणी करत त्यातील आठ हजार रुपये स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

किशोर जगन्नाथ जबडे (वय ४८, रा. मदिना मश्जिदजवळ, सुभाषनगर) असे संशयिताचे नाव आहे. मिरज शहर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या चहा टपरीजवळ ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हा मानधनावर महापालिकेकडे सेवेत आहे तर संशयित किशोर जबडे हा आरोग्य विभागात प्रभाग २० साठी प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराची चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याचे तीन हजार असे १२ हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीअंती आठ हजारांची लाचेची मागणी केल्याचे ‘लाचलुचपत’च्या तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याच्या बाजूस असलेल्या एका चहा टपरीजवळ सापळा लावला असता, तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्विकारताना जबडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. जबडे याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रीतम चौगुले, रामहरी वाघमोडे, अजित पाटील, सुदर्शन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

“पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगींना”…वाचा सविस्तर..!

Next Post

डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले

डॉक्टर दाम्पत्याचा बंगला फोडला; 25 तोळे सोने चोरले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group