• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

Nagpur Crime

Admin by Admin
November 20, 2023
in क्राईम
0
पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या पत्नीने आजाराला कंटाळून ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंतेनगरात उघडकीस आली.

लता सुनील वाकोडे (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता वाकोडे यांना गेल्या १० ते १५ वर्षांपासून वाताचा त्रास होता. गेल्या काही महिन्यांपासून तो त्रास वाढला. त्यातून त्या मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शुक्रवारी (ता.१७) सुनील वाकोडे मुख्यालयात कर्तव्यावर निघाले. याशिवाय मुलगा त्याच्या नोकरीवर गेला. यादरम्यान त्यांनी घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी मुलगा घरी आला असता, दार आतून बंद असल्याचे आढळले. त्याने बराच वेळ आवाज दिल्यावर प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे याची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर दार तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांना लता यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक आले.

याबाबत पाचपावली पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिस निरीक्षक आंभोरे यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासात त्यांना वाताचा त्रास असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

Previous Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी “या’ राज्यात जाणार..! कोणाचा करणार प्रचार..?

Next Post

सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी IPS रितू खोकर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी IPS रितू खोकर

सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी IPS रितू खोकर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group