• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी “या’ राज्यात जाणार..! कोणाचा करणार प्रचार..?

Admin by Admin
November 20, 2023
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी “या’ राज्यात जाणार..! कोणाचा करणार प्रचार..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राजस्थानच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. निवडणुकीच्या अगदी अखेरच्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानच्या दौऱ्यावर प्रचाराला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठी नाही तर ते शिवसेनेचा राजस्थान मधला एकमेव उमेदवार असणाऱ्या राजेंद्र गुढांचा प्रचार करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

राजस्थान मध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहे.

तर मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी हे मतदाना करता राजस्थानला जातात. या मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर राजस्थानला जात असल्याने शिवसेना आता महाराष्ट्रा बाहेरही विस्थापित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.

कोण आहे राजेंद्र गुढा?

राजेंद्र गुढा हे गेहलोत सरकार मधील मंत्री आहेत. 55 वर्षांचे गुढा जवळपास 2008 पासून राजस्थानच्या राजकारणात सक्रीय आहेत. आधी काँग्रेस आणि मग बहुजन समाज पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते बसपाकडून निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस सरकारमध्ये सामिल झाले त्यांना मंत्रीपद देखील मिळाले. पण सत्तेत असतानाही अशोक गेहलोत यांचे मुख्य टिकाकार अशीच त्यांची ओळख राहिलेली आहे.

Previous Post

कार्तिकी यात्रेसाठी प्रसादाचे १० लाख लाडू

Next Post

पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group