• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती.

Admin by Admin
November 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली महापालिका उपायुक्तपदी पंडित पाटील यांची नियुक्ती.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची बदली सांगली-मिरज व कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी झाली. यापूर्वी त्यांनी जत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कामकाज केलेले आहे.

सांगली महापालिकेतील उपायुक्तपद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे काही अधिका-यांना उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या रिक्त जागेवर पंडित पाटील यांची पदोन्नतीने महापालिका उपायुक्तपदी बदली झाली.

पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. २०१० साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साता-यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले.

सध्या लोणावळा नगर परिषदेत ते मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून कार्यरत होते. या काळात लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून देशात नामांकन मिळाले. पुढील आठवड्यात सांगली-मिरज व कुपवाड महापालिकेत ते उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

Previous Post

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली

Next Post

Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन

Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group