• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

Admin by Admin
November 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी / शहरातील साखर कारखान्यासमोर कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोघा अल्पवयीनांसह चाैघांना शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. सोहेल राजेसाब गलगले (वय २४, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली) आणि विशाल बाबुराव रणदिवे (१९, रा.चिन्मय पार्कजवळ, यशवंतनगर,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी लुटमारीसह चायनिज सेंटरही फोडल्याची पोलिसांसमोर कबुली दिली.

माहुली (ता. खानापूर) येथील सुरज भिमराव फाळके हे गावी जात असताना त्यांना माधवनगर रस्त्यावरील साखर कारखान्यासमोर अडवून कोयत्याने लुटले होते.

शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित हे चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी जूना बुधगाव रस्त्यावरील वाल्मीकी आवासमध्ये येणार आहेत. त्यानुसार पथक तिथे गेले. पोलिसांना बघून संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच चौघांना पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे चोरीच्या तीन दुचाकीसह रोकड असा एक लाख ८५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, गौतम कांबळे, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Next Post

सांगलीत दगडफेक, महापालिकेच्या विराेधात रस्त्यावरील विक्रेते आक्रमक; पाेलीस घटनास्थळी दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत दगडफेक, महापालिकेच्या विराेधात रस्त्यावरील विक्रेते आक्रमक; पाेलीस घटनास्थळी दाखल..

सांगलीत दगडफेक, महापालिकेच्या विराेधात रस्त्यावरील विक्रेते आक्रमक; पाेलीस घटनास्थळी दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group