• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Admin by Admin
November 4, 2023
in सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Earthquake in Nepal । सध्या भूकंपाच्या धक्क्याने अनेक देश हादरत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळत आहे. आता भारताच्या शेजारी देश असलेल्या नेपाळला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये शेकडो इमारतींची पडझड झाली असून आतापर्यंत या घटनेत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

नेपाळच्या (Nepal) पीएमओ कार्यालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपाची तीव्रता अवधी भीषण होती की, यामध्ये शेकडो इमारती जमीन दोस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये 70 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून या घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Previous Post

शिराळ्यात वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार..

Next Post

कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group