• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मस्ती जिरवली..! “हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही म्हणत पकडली थेट पोलिसाची “कॉलर”; पोलीसाने दाखवला “खाकीचा ट्रेलर”..!

Admin by Admin
November 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मस्ती जिरवली..! “हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही म्हणत पकडली थेट पोलिसाची “कॉलर”; पोलीसाने दाखवला “खाकीचा ट्रेलर”..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

  • साताऱ्यातील घटना; पोलिसांनी दिला चोप.

सातारा : खबऱ्या प्रतिनिधी /हरवलेला फोन मला दे, असे म्हणत एका पोलिस कर्मचाऱ्याची थेट गचुंडी धरून इतर पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. ही घटना दि. ३० रोजी रात्री सव्वादोन वाजता बाॅम्बे रेस्टाॅरंट पुलाखाली घडली.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

विशाल नवनाथ चव्हाण (वय २९, रा. महागाव, ता. सातारा), सूरज उत्तम लोखंडे (वय ३०, शिवराज काॅलनी, गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल अमोल सापते हे सोमवारी रात्रपाळी ड्युटीवर होते. ११२ नंबरला वरील संशयितांनी फोन करून आमचा मोबाइल आणि पैसे चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर ११२ नंबरने या प्रकाराची माहिती बिटमार्शल अमोल सापते यांना दिली. सापते हे तातडीने त्या ठिकाणी गेले.

त्यावेळी संशयितांनी उलट सापते यांनाच दमदाटी शिवीगाळ सुरू केली. हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही, असे म्हणून त्यांची गचुंडी धरली. हा प्रकार वाढत गेल्याने काॅन्स्टेबल सापते यांनी सहायक पोलिस निरीक्षक पालवे यांना या घटनेची माहिती दिली. पालवे व चालक देवकर हे तेथे पोहोचले. यावेळी दोघांनाही शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. पोलिस काॅन्स्टेबल अमोल सापते यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. हवालदार मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

आरक्षणासाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद

Next Post

मोठी ब्रेकिंग – मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग – मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

मोठी ब्रेकिंग - मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group