• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आरक्षणासाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद

Admin by Admin
November 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
आरक्षणासाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा : खबऱ्या प्रतिनिधी/ मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने दिलेल्या सातारा जिल्हा बंदच्या हाकेला जिल्ह्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

सातारा शहरासह वाई, फलटण, कराड, दहिवडी, वडूज, खंडाळा, महाबळेश्‍वर पाचगणी, पाटण अशा शहरांसह ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला थोड्या फार प्रमाणात झळ बसली. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असल्याने पालकांची मात्र असुविधा होऊन पळापळ झाली. सातारा, कराड, वडूज, फलटण व कोरेगाव या आगारातील एसटीच्या सेवेवर मात्र याचा परिणाम झाला. दहिवडी येथील विद्यार्थ्यांनी आरक्षण द्या तरच परीक्षा देऊ अशी भूमिका घेत शाळेसमोरच जोरदार आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातून आंदोलनाचा एल्गार सुरू झाला असून त्याची झलक मंगळवारी जिल्हा बंदच्या निमित्ताने पाहायला मिळाली. जिल्ह्यातील व्यावसायिकांनी दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवले होते. या बंदच्या आवाहनामुळे व्यापारी वर्तुळातील दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. खंडाळा, वाई, फलटण, कराड, पाटण, कोरेगाव, सातारा येथे तालुक्‍याच्या ठिकाणी मराठा आंदोलकांची साखळी उपोषण सत्रे सुरू आहेत.

भजन, कीर्तन, रॅली, पदयात्रा, “एक दिवस समाजासाठी’ अशा विविध उपक्रमांतून मराठा आरक्षणाचा लढा जिल्ह्यात सातत्याने सुरू असून सुमारे साडेपाचशे गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे 500 आंदोलकांनी रस्त्यावर बसकन मारून आरक्षण जाहीर केल्याशिवाय आमच्या मांडवात येऊ नका, अशी भूमिका घेतली. कराड, वाई, फलटण येथे सुद्धा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.

जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी व्यवहार बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. बाजार समितीची आवारे, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकाने बंद ठेवल्याने तब्बल दहा कोटीचे व्यवहार ठप्प झाले. अत्यावश्‍यक सेवा या बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेडिकल दुकाने, आरोग्यसेवा व्यवस्थित सुरू होत्या. बंदचा फटका काही प्रमाणात विद्यार्थ्यांना बसला. रिक्षावाल्या काकांमध्ये बंदबाबत संभ्रम राहिल्याने काही ठिकाणी पाल्यांच्या परीक्षेसाठी पालकांना स्वतः धावपळ करावी लागली.

सातारा परिवहन विभागाच्या सातारा, कराड, कोरेगाव येथील काही एसटी सेवा नियंत्रित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. जिल्ह्यात बंदला अत्यावश्‍यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्यावीने सांगण्यात आले.

Previous Post

सांगली | “त्या”ने केली ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, ७८ किलो गांजा जप्त करीत पोलिसांची मोठी कारवाई..!

Next Post

मस्ती जिरवली..! “हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही म्हणत पकडली थेट पोलिसाची “कॉलर”; पोलीसाने दाखवला “खाकीचा ट्रेलर”..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मस्ती जिरवली..! “हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही म्हणत पकडली थेट पोलिसाची “कॉलर”; पोलीसाने दाखवला “खाकीचा ट्रेलर”..!

मस्ती जिरवली..! "हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही म्हणत पकडली थेट पोलिसाची "कॉलर"; पोलीसाने दाखवला "खाकीचा ट्रेलर"..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group