• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | “त्या”ने केली ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, ७८ किलो गांजा जप्त करीत पोलिसांची मोठी कारवाई..!

Admin by Admin
November 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सांगली | “त्या”ने केली ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, ७८ किलो गांजा जप्त करीत पोलिसांची मोठी कारवाई..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • एपीआय संदीप शिंदे “अँक्शन” मोडवर..!
  • अवैद्य व्यवसायाविरोधात धडक मोहीम.
  • उमदी पोलिसांकडून ७८ किलो गांजा जप्त.

उमदी : खबऱ्या प्रतिनिधी /करजगी (ता. जत) येथील एका ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी छापा टाकत ७८ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ७ लाख ८० हजार इतकी असून ही कारवाई आज (दि.३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी संशयित आरोपी बिराप्पा जनाप्पा हजंगी (रा. बंजाळवस्ती, करजगी) यांच्यावर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हाक्के यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी हजगी यास मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमदी पोलिसांनी गेल्या महिन्याभरात अवैद्य व्यवसायाविरोधात मोहीम सुरू केली आहे. करजगीतील एका ऊसाच्या शेतात गांजा लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर आज(दि.३१) दुपारी करजगी गावापासून काही अंतरावर असलेल्या हंजगी यांच्या शेतात छापा टाकून उसातील गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची ७८ किलो इतके वजन झाले असून या गांजाची बाजार भावाप्रमाणे ७ लाख ८० हजार इतकी आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी , मनीष कुंभरे, इंद्रजीत घोदे, महेश स्वामी यांनी केली.

Previous Post

सांगलीत तब्बल ४ कोटीचे सोने पोलिसांनी केले हस्तगत

Next Post

आरक्षणासाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आरक्षणासाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद

आरक्षणासाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group