• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

Admin by Admin
October 29, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली– शहरातील वानलेसवाडी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर चाकूने वार करत खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी विजयपूर (कर्नाटक) येथून जेरबंद केले. शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय २५, रा.कक्केरी, जि. यातगिरी, कर्नाटक) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, संशयित पती सिदाप्पा नागाप्पा कटीमणी (वय ३०, रा. कक्केरी, जि. यातगिरी, कर्नाटक) हा खुनानंतर पसार झाला होता. विश्रामबाग पोलिसांनी तपास करत त्याला अटक केली.

गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मृत शिल्पा यांच्या आई मंजुळा ऊर्फ लक्ष्मीबाई शिवरुद्र दोड्डमणी ( रा. मूळ तळवारगीर, कर्नाटक, सध्या वानलेसवाडी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कर्नाटकातील कक्केरी येथील सिदाप्पा कटीमणी याच्यासोबत शिल्पाचा विवाह झाला. मात्र, सिदाप्पा हा वारंवार तिच्यावर संशय घेत मारहाण करीत होता. याला कंटाळून शिल्पा वानलेसवाडी येथे माहेरी आईजवळ आल्या होत्या. गुरुवारी रात्री संशयित सिदाप्पा येथे आला व त्याने शिल्पाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व चाकूने वार केले. यातच शिल्पाचा मृत्यू झाला. यानंतर संशयित तेथून पसार झाला. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने विजयपूर येथे जात संशयिताला ताब्यात घेतले.

Previous Post

ब्रेकिंग | सातारा पोलिसांची मोठी कारवाई ; कास रस्त्यावरील हॉटेलवर छापा…२१ जणांवर कारवाई…!

Next Post

‘त्या’ पोलिस हवालदारांची बदली न केल्यास उपोषण..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘त्या’ पोलिस हवालदारांची बदली न केल्यास उपोषण..

'त्या' पोलिस हवालदारांची बदली न केल्यास उपोषण..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group