• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सातारा पोलिसांची मोठी कारवाई ; कास रस्त्यावरील हॉटेलवर छापा…२१ जणांवर कारवाई…!

Admin by Admin
October 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा कास रस्त्यावर संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात महिला नाचवणाऱ्या व पैसे उडविले जात असलेल्या पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकत ग्राहकांसह हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटर्स अशा २१ जणांवर कारवाई करत ८२ हजार ६९८ रुपये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त केले.

जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांनी पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर छापा टाकून ही कारवाई केली.

संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात सहा महिला नाचवणाऱ्या व पैसे उडविले जात असलेल्या पेट्री येथील रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. ग्राहकांसह हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटर्स अशा २१ जणांवर कारवाई करत ८२ हजार ६९८ रुपये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त केले. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी कारवाई केली.

सातारा तालुका व शहर पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. हॉटेलमधील हॉलमध्ये सहा बारबाला बीभत्स हावभाव करीत नृत्य करीत असल्याचे दिसून आले. याचबरोबर उपस्थित गिऱ्हाईक हे यांचा आनंद घेऊन त्या बारबालांवर नोटा उडवीत होते. त्या अनुषंगाने हॉलमध्ये बारबाला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या १८ इसमांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यामधील ८२ हजार ६९८ रुपये त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.

तसेच हॉलमधील जी बी एस कंपनीची साऊंड सिस्टिम व डिस्को लाइट देखील जप्त करण्यात आले. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक, मॅनेजर आणि वेटर यांसह २१ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

Previous Post

अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्यांच्या बंद मध्ये कडेगांव तालुका सहभागी होणार

Next Post

सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group