• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्यांच्या बंद मध्ये कडेगांव तालुका सहभागी होणार

सोमवारी दिवसीय धरणे आंदोलन

Admin by Admin
October 28, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्यांच्या बंद मध्ये कडेगांव तालुका सहभागी होणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगांव:- अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेता समितीमार्फत दि. ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी पुकारलेल्या एकदिवसीय बंद आंदोलनात कडेगांव तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेते सहभागी होणार असून त्या दिवशी कडेगांव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार अजित शेलार यांना मुद्रांक विक्रेत्यांकडून देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आम्हा मुद्रांक विक्रेत्यांना यापूर्वी ३० हजार रुपयांपर्यंत मुद्रांक विक्रीची परवानगी होती व त्यास आम्हाला ३ टक्के मनौती मिळत होती.त्यानंतर शासनाने आमची विक्री मर्यादा ३० हजार वरून १० हजार केली आहे आणि फक्त १०० व ५०० ह्या दोनच प्रकारचे मुद्रांक विक्रीस उपलब्ध करून दिले आहेत मात्र मनौती मध्ये कोणतीही वाढ केली नाही.यावर आता आमचेकडे उपलब्ध १०० व ५०० चे मुद्रांक पारंपरिक विक्रीची प्रणाली बंद करून ती बँकेमार्फत फ्रँकिंग द्वारे राबविण्याचे ठरवून आमचे रोजीरोटी हिरावून घेऊन आम्हास देशोधडीला लावणेचे धोरण सरकारने आखले आहे. आमची एवढीच मागणी आहे की,मुद्रांक विक्री बाबत शासनातर्फे जी नवीन प्रणाली येईल ती मुद्रांक विक्रेत्यांमार्फत राबविण्यात यावी. तरी शासनाच्या या नवीन धोरणाविरोधात अखिल महाराष्ट्र मुद्रांक समिती मार्फत दि. ३० ऑक्टोंबर रोजी राज्यव्यापी मुद्रांक विक्री व दस्त नोंदणी बंदचे आंदोलन पुकारले आहे त्यात कडेगांव तालुका सहभागी होणार आहे तसेच या दिवशी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.निवेदनावर तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांच्या सह्या आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | मानवी कवटी, हाडे, काळे पांढरे केस, साडी, परकर, ब्लाऊज बऱ्याच वस्तू….! सर्वत्र एकच खळबळ…!!

Next Post

ब्रेकिंग | सातारा पोलिसांची मोठी कारवाई ; कास रस्त्यावरील हॉटेलवर छापा…२१ जणांवर कारवाई…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

ब्रेकिंग | सातारा पोलिसांची मोठी कारवाई ; कास रस्त्यावरील हॉटेलवर छापा...२१ जणांवर कारवाई...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group