• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मानवी कवटी, हाडे, काळे पांढरे केस, साडी, परकर, ब्लाऊज बऱ्याच वस्तू….! सर्वत्र एकच खळबळ…!!

Admin by Admin
October 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | मानवी कवटी, हाडे, काळे पांढरे केस, साडी, परकर, ब्लाऊज बऱ्याच वस्तू….! सर्वत्र एकच खळबळ…!!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर : खबऱ्या प्रतिनिधी /नांदणी (ता. शिरोळ) येथे शेतकरी आपल्या शेताची नांगरट करीत असताना फाळाला मानवी कवटी तसेच हाडे, काळे पांढरे केस, साडी, परकर, ब्लाऊज आदी वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिरोळ पोलिसांनी या सर्व वस्तूंचा पंचनामा करून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याकरिता जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांकडून याबाबत माहिती मागवली आहे. सापडलेल्या वस्तूंच्या अनुषंगाने या वस्तू, कवटी व हाडे महिलेच्याची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माणगावकोडी नांदणी येथील शेतकरी व ट्रॅक्टर चालक राकेश आप्पासाहेब पाटील हे आपल्या शेतात शाळू पिकाची पेरणी करण्याकरिता ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करीत होते.

यावेळी ट्रॅक्टरच्या फाळाला लागून मातीतून मानवी कवटी वरती आली. काही अंतरावर शेतात ठिकठिकाणी व कंपाउंडलगत मानवी हाडे, काळे-पांढरे केस, मळकटलेला परकर, गुलाबी रंगाची साडी, त्यावरती हिरव्या जांभळ्या रंगाची फुलाची डिझाईन, चॉकलेट रंगाचा फाटलेला ब्लाऊज तसेच स्टीलचा डबा आढळून आले. डब्याच्या झाकणावर गंगुबाई कोळी असे नाव कोरलेले आहे. शिरोळ पोलिसांनी सापडलेल्या सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्या आहेत.

Previous Post

मुंबईत फ्लॅट तोही समुद्रकिनारी ! फक्त 20 लाखांत मास्टर बेडसह 1BHK फ्लॅट, फक्त 1 रुपयांत करा बुकिंग, पहा डिटेल्स..

Next Post

अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्यांच्या बंद मध्ये कडेगांव तालुका सहभागी होणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्यांच्या बंद मध्ये कडेगांव तालुका सहभागी होणार

अखिल महाराष्ट्र मुद्रांक विक्रेत्यांच्या बंद मध्ये कडेगांव तालुका सहभागी होणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group