• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भयंकर.! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Admin by Admin
October 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
भयंकर.! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Satara Police Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४ जणांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजल कांबळे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गाडी चालवणाऱ्या पोलिसाने मद्यपान केलं असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ४ तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. मृत तरूण हा कोळेवाडीचा तर जखमी तरूण कुसूरमधील असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

Previous Post

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊस, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं..

Next Post

ब्रेकिंग | पोलीस हवालदाराने घेतले विष..म्हणाले, ‘मराठा आरक्षण नाही, काही उपयोग नाही’..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

ब्रेकिंग | पोलीस हवालदाराने घेतले विष..म्हणाले, 'मराठा आरक्षण नाही, काही उपयोग नाही'..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group