• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | पोलीस हवालदाराने घेतले विष..म्हणाले, ‘मराठा आरक्षण नाही, काही उपयोग नाही’..

Admin by Admin
October 23, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Police Constable Took Poison For Maratha Reservation: मनोज जरांगे याच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत चालला आहे. राज्यभरातील मराठा समाजाकडून जरांगे यांना पाठिंबा मिळतोय. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. रतन घोगरे असं विष प्राशन केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मनोज जरांगे याच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत चालला आहे. राज्यभरातील मराठा समाजाकडून जरांगे यांना पाठिंबा मिळतोय. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. रतन घोगरे असं विष प्राशन केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नसून, काही उपयोग नाही, मी आत्महत्या करतोय’ असा फोन मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्याला करत रतन घोगरे यांनी विषारी औषध प्राशन केले. परंतु तातडीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना परंडा शहरात घडली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच परांड्यात पोलिस कर्मचाऱ्याने विष प्राशन केले आहे. या घटनेमुळे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या मनातील तीव्र भावना समोर येताना दिसत आहेत.

रतन घोगरे हे परंडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी रतन घोगरे यांनी आपल्या पोलीस वसाहतीतील घरी असताना सोशल मीडियावर मराठा आरक्षणाचे स्टेटस ठेवत विषारी औषध प्राशन केले. त्याआधी त्यांनी परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या एका सदस्यास मोबाईलवरून कॉल केला आणि आपल्याला आरक्षण मिळत नाही. काही उपयोग नाही नाही. मी विष पिऊन आत्महत्या करतो असे म्हणत विष प्राशन केले. कॉलवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना असे करू नका, हे बरोबर नाही. जरांगे साहेबांनी आत्महत्या करू नका असे सांगितले आहे. तुम्ही आत्महत्या करू नका अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु घोगरे यांनी मी विषारी औषध घेतले आहे. धन्यवाद… असं म्हणत फोन कट केला.

घोगरे यांचा फोन कट होताच समोरच्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ते स्वतः इतर सदस्यांसह पोलीस वसाहतीकडे पोहोचले. तेथे त्यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी आणि इतर मराठा समाज बांधवांनी तातडीने रतन घोगरे यांना चार चाकी वाहनातून शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

भयंकर.! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Next Post

😳सांगली ब्रेकिंग |🔥 वेश्या अड्ड्यावर छापा, देहविक्री करणाऱ्या ७ बांगलादेशी व ३ पश्चिम बंगाली महिलांची सुटका : दोघांवर गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳सांगली ब्रेकिंग |🔥 वेश्या अड्ड्यावर छापा, देहविक्री करणाऱ्या ७ बांगलादेशी व ३ पश्चिम बंगाली महिलांची सुटका : दोघांवर गुन्हा दाखल.

😳सांगली ब्रेकिंग |🔥 वेश्या अड्ड्यावर छापा, देहविक्री करणाऱ्या ७ बांगलादेशी व ३ पश्चिम बंगाली महिलांची सुटका : दोघांवर गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group