• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वनविभागाच्या निष्काळजी मानवांनी मोराला रस्त्यावरून फरफटत नेले..! पक्षीप्रेमी असल्याचा आव आणणारे आता कुठे गेले..?

मोराची हेळसांड झाल्याने मृत्यू ; वन विभागाचा "गांडू" कारभार चव्हाट्यावर..!

Admin by Admin
October 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
वनविभागाच्या निष्काळजी मानवांनी मोराला रस्त्यावरून फरफटत नेले..! पक्षीप्रेमी असल्याचा आव आणणारे आता कुठे गेले..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड : खबऱ्या प्रतिनिधी / अत्यवस्थ मोराला दोघे दुचाकीवरून नेत होते. टॉवेलने गुंडाळलेल्या अवस्थेतील त्या मोराचा पिसारा रस्त्याला घासत होता. त्या दोघांच्या ताब्यातून सुटण्यासाठी मोराची असह्य अशी धडपड सुरु होती.

त्यांना त्याही अवस्थेत तो मोर टोच्याही मारत होता. बघ्यांपैकी एकाने ही सारी कसरत मोबाईल कॅमेऱ्यात पकडली आणि समाजमाध्यमांवरून व्हायरल केली.

मोर नेणारे ‘ते’ दोघे कोण आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर ते दोघे वनविभागाचे कर्मचारी असून सरकारी वाहन नसल्याने मोराला तातडीने उपचार मिळावेत यासाठी धडपड करीत असल्याचे स्पष्ट झाले. या कसरतीमागचं कारण इतकंच की म्हणे वनविभागाकडे मोराला नेण्यासाठी वाहतुकीची गाडीच नव्हती. राष्ट्रीय पक्षी मोराला उपचारासाठी वाहन मिळू नये ही वन विभागाची दयनीय अवस्था. मात्र यानिमित्ताने वनविभागाच्या कारभाराचे पुरते धिंडवडे काढत नेटकऱ्यांनी जगभर व्हायरल केले.

याबाबतची अधिक माहिती अशी – कुपवाड येथील पाटील मळ्यात एक मोर अत्यवस्थ असल्याची वार्ता वनविभागाला समजली. वनविभागाचे दोन कर्मचारी तत्काळ जागेवर पोहचले. शुध्द हरपलेल्या अवस्थेतील मोराला त्या दोघांनी तत्काळ टॉवेलमध्ये गुंडाळत उपाचारासाठी म्हणून कुपवाडमधीलच वनविभागाच्या कार्यालयाकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तत्काळ वाहन उपलब्ध नसल्याने दुचाकीवरून त्यांनी मोराला मांडीवर घेत कूच केले.

दरम्यान दुचाकीवरून नेताना मोराचा भला मोठा पिसारा रस्त्यावरून घासत जात होता. त्याचवेळी मोर सुटकेची धडपडही करीत होता. मागे बसलेल्या कर्मचाऱ्याला तो टोच्याही मारत होता. मोराची होत असलेली ही हेळसांड काहींनी कॅमेऱ्यात टिपली आणि व्हायरल केली. आज सुटीमुळे बहुतेक वरीष्ठ कर्मचारी बाहेरगावी होते.

वनविभागाचा या भोंगळ कारभाराचे समाजमाध्यमावरून धिंडवडे निघाले. काहींना ही मोराची तस्करी वाटली. मात्र घडल्या प्रकारावर नेटकऱ्यांनी वनविभागावर टिकेची झोड उठवली. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी पंचशीलनगर येथे मोराची तस्करी करणाऱ्या मुलांना प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, सतर्क पोलिस आणि नागरीकांनी पकडले. त्यानंतर हे सारे वन विभागास कळवण्यात आले. मात्र यावर कारवाईची जबाबदारी वन विभागाने पोलिसांवर ढकलली. आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही.

 

‘वन विभागाकडून अशी राष्ट्रीय पक्ष्याची अशी हेळसांड होत असेल तर नागरीकांनी काय आदर्श घ्यावा? वन्यजीवांची हाताळणी कशी केली पाहिजे याचे सामान्य ज्ञान कर्मचाऱ्यांना दिसत नाही. वनविभागाचे अधिकृत वाहन नसेल तर रिक्षा किंवा टेम्पोसारखे खासगी वाहन उपलब्ध नव्हते का? अधिकृत वाहन का नाही याबद्दल अधिकाऱ्यांनी खुलासा करावा. संबंधित कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. मी स्वतः याबाबत लेखी तक्रार नोंदवणार आहे.’

– कौस्तुभ पोळ, ॲनिमल राहत, सांगली

‘बेशुद्ध असल्याने तातडीने उपचार मिळावेत यासाठी कर्मचारी त्याठिकाणी गेले होते. मोटार चालक उपलब्ध नसल्याने त्यांनी दुचाकीवरून त्या मोराला वनविभागाच्या कार्यालयात आणला आहे. ते शिकारीचा नव्हे तर तातडीने मदतीचा त्यांचा हेतू होता.’

– डॉ. अजित साजणे, उपवनसंरक्षक सांगली

Previous Post

उमदीत पोलिसांनी पकडले ट्रॅक्टरसहित वाळूचोर..! महसूलच्या जीवाला “मंथली हप्त्यांचा” घोर..?

Next Post

“लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसणार” – रोहित आर.आर पाटील यांचा इशारा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसणार” – रोहित आर.आर पाटील यांचा इशारा..!

"लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसणार" - रोहित आर.आर पाटील यांचा इशारा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group