• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसणार” – रोहित आर.आर पाटील यांचा इशारा..!

Admin by Admin
October 2, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
“लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, आम्ही आमच्या हक्कासाठी उपोषणाला बसणार” – रोहित आर.आर पाटील यांचा इशारा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसणार आहेत. आजपासून (2 ऑक्टोबर) म्हणजेच गांधी जयंतीपासून हे उपोषण सुरु होणार आहे.

सावळज आणि इतर 8 गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा, या मागणीसाठी हे उपोषण केलं जाणार आहे. या उपोषणासंदर्भात गोपनीय खबऱ्याशी बोलताना राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील विविध मुद्यांवर भाष्य केलं. उपोषणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसंच आगामी निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तसंच विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे.

खरंतर आज घडीला माझं वय वर्ष 24 आहे. अचानक निवडणूक लागली तर कदाचित मी निवडणुकीला उभं राहू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या भविष्याची चिंता जर मी करून राजकारण करत असल्याचा आरोप हा निरर्थक आहे.निवडणुकीच्या दृष्टिकोन काम करण्याचा विचार मी माझ्या डोळ्यासमोर कधीही ठेवला नाही. वयाच्या सोळाव्या वर्षीपासून मी या मतदारसंघांमध्ये फिरतोय. या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाच्या मागे उभा राहण्याचं काम गेले अनेक वर्ष करतोय. त्यामुळे इथल्या लोकांना माहिती आहे की कोण किती अंधारात आहे. निवडणुका आल्यावर कुणी फिरायला चालू केलंय, हे पण लोकांना माहिती आहे, असं म्हणत रोहित पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

मी असं ऐकलं की, समाज माध्यमांवरती आमची प्रसिद्धी वाढली म्हणून रोहित पाटील आणि सुमनताई हे नौटंकी करत आहेत, असा आरोप केला जातोय. खरंतर समाज माध्यमांवरती अनेक प्रकारचे लोक प्रसिद्ध होत असतात. अलीकडच्या काळात अनेक कलाकार, अनेक नृत्यांगणाही प्रसिद्ध झाल्या. पण याचा अर्थ ते प्रसिद्ध आहेत म्हणून निवडणुकीला उभं राहायचं असतं का?, असं म्हणत रोहित पाटील यांनी टोला लगावला आहे.

चांगलं काम करणाऱ्यांचा मागे लोक उभे राहतात. माझं भविष्य अंधार टाकायचं की उजेडात हे लोक ठरवतील. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहंकाळ तालुक्यातल्या सत्सद विवेक बुद्धी असणाऱ्या सर्व लोकांवर माझा विश्वास आहे. ते निश्चितपणाने माझं भविष्य काय करायचं. त्यांनी जर घरी बसवलं तर घरी बसायची तयारी माझी आहे. लोक ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल, असंही रोहित पाटील म्हणालेत.

Previous Post

वनविभागाच्या निष्काळजी मानवांनी मोराला रस्त्यावरून फरफटत नेले..! पक्षीप्रेमी असल्याचा आव आणणारे आता कुठे गेले..?

Next Post

धक्कादायक! सांगलीतील क्रूर प्रकाराने खळबळ.. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक! सांगलीतील क्रूर प्रकाराने खळबळ.. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न..

धक्कादायक! सांगलीतील क्रूर प्रकाराने खळबळ.. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group