• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नांद्रेत कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून..

Admin by Admin
September 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
नांद्रेत कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कौटुंबिक वादातून नांद्रे (ता. मिरज) येथे दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय 30) याचा धारदार हत्याराने वार व काठीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी रात्री ही घटना घडली.याप्रकरणी संशयित राहुल ऊर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (32) याला अटक करण्यात आली आहे.

कुंभार बंधू सेंट्रिंगचे काम करतात. दोघांना दारूचे व्यसन होते. संशयित राहुलची पत्नी सहा वर्षापूर्वी त्याला सोडून गेली आहे. नांद्रेतील कुंभार गल्लीत दोघेही आई, वडिलांसोबत राहतात. दोघेही दररोज दारू पिऊन घरी यायचे. घरखर्चाला पैसे देण्यावरून त्यांच्यात वाद होत असे. या वादातून कंटाळून त्यांच्या आई, वडिलांनी दोन महिन्यापूर्वी घर सोडले. ते गावात भाड्याने राहतात.

गुरुवारी रात्री दत्तात्रय दारू पिऊन घरी आला. संशयित राहुलने त्याला ‘तुला दारू प्यायला पैसे आहेत, घरखर्चाला का देत नाहीस’, असा जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. राहुलने दत्तात्रयच्या डोक्यात काठीने मारहाण केली. तसेच धारदार हत्यार घेऊन वार केले.

दोघांत सुरू असलेल्या वादाचा आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी दत्तात्रयला उपचारार्थ हलविले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक शिवाजी गायकवाड, हवालदार संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्ल्यासाठी वापरलेले हत्यार व काठी जप्त केली आहे. याप्रकरणी मृत दत्तात्रयचे वडील प्रकाश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.

Previous Post

सांगली : दुःखद बातमी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

विशाल पाटील यांची पात्रता त्यांचे नेते ठरवतील : खासदार संजय पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

विशाल पाटील यांची पात्रता त्यांचे नेते ठरवतील : खासदार संजय पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group