• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजपच्या दहीहंडीला संघर्षाचा ऊत..? एकीकडे सिनेअभिनेत्रींचा जलवा तर दुसरीकडे शिवरायांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम..!

Admin by Admin
September 10, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
भाजपच्या दहीहंडीला संघर्षाचा ऊत..? एकीकडे सिनेअभिनेत्रींचा जलवा तर दुसरीकडे शिवरायांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/भाजप- जनसुराज्य महायुतीच्या दहीहंडीला प्रत्युत्तर म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखालील युवा मंचने सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दोन स्वतंत्र दहीहंडीच्या कार्यक्रमामुळे भाजपअंतर्गत असलेला सुप्त संघर्ष उफाळून आला आहे.

पालकमंत्री खाडे यांचे सहकारी तथा भाजप अनुसूचित जाती जमाती सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी महायुतीच्यावतीने शनिवारी दहीहंडीचे आयोजन केले होते. यासाठी सिनेअभिनेत्रींना पाचारण करण्यात आले होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाच लाख रूपये इनामाची दहीहंडी अशी याची प्रसिध्दीही करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेमध्ये पालकमंत्री खाडे यांना गौण स्थान देण्यात आले.

याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे युवा नेते पालकमंत्री खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे यांनी सोमवारी मिरज हायस्कूल येथील मैदानावर दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहीहंडीसाठी स्थानिक पाच संघांना आमंत्रित करण्यात आले असून यासाठी एक लाखाचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. यावेळी अवधूत गांधी आळंदीकर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे खाडे यांनी शनिवारी सांगितले.

Previous Post

मोठी बातमी | राज्यभर संप करण्याचा एस.टी कर्मचारी संघटनेचा इशारा ; लालपरीची चाकं पुन्हा थांबणार..?

Next Post

सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group