• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | राज्यभर संप करण्याचा एस.टी कर्मचारी संघटनेचा इशारा ; लालपरीची चाकं पुन्हा थांबणार..?

Admin by Admin
September 10, 2023
in मंत्रालय, सामाजिक
1 min read
0
मोठी बातमी | राज्यभर संप करण्याचा एस.टी कर्मचारी संघटनेचा इशारा ; लालपरीची चाकं पुन्हा थांबणार..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. असे असले तरी आणखी चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबर पासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत. 11 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जाणार आहे. याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात संप केला जाईल, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यावरुन 38 टक्के झाला आहे. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता 42 टक्के करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे.

तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबर पासून संप करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर 13 सप्टेंबर पासून राज्यातील जिल्हास्तरावर हे आंदोलन केले जाईल असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने काढण्यात आले आहे.

Previous Post

कुपवाडमध्ये रंगला करबल मेळावा ; उत्साहात झाली सांगता..!

Next Post

भाजपच्या दहीहंडीला संघर्षाचा ऊत..? एकीकडे सिनेअभिनेत्रींचा जलवा तर दुसरीकडे शिवरायांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपच्या दहीहंडीला संघर्षाचा ऊत..? एकीकडे सिनेअभिनेत्रींचा जलवा तर दुसरीकडे शिवरायांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम..!

भाजपच्या दहीहंडीला संघर्षाचा ऊत..? एकीकडे सिनेअभिनेत्रींचा जलवा तर दुसरीकडे शिवरायांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group