Wednesday, June 4, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | अखेर ‘माफी’नामा..!

- पोलिसांचा लाठीमार निषेधार्ह, आंदोलकांची माफी मागतो - फडणवीस

Admin by Admin
September 4, 2023
in क्राईम, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, सामाजिक
0
मोठी ब्रेकिंग | अखेर ‘माफी’नामा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या मराठा समाजावर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची माफी मागितली आहे. हा लाठीमार निषेधार्ह आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. या मुद्द्यावरून काही नेते राजकारण करत आहेत. त्यांनी ते सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही, असा सवालही फडणवीस यांनी केला.

१ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले होते. त्यांच्यावर लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडी डागली, बंदुकातून छर्रे डागले, तसेच हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात संतापाची आग पेटली होती. राज्यभरात गेले तीन दिवस तीव्र आंदोलने सुरू आहेत. या नशंस घटनेबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत माफी मागितली. आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची होती. त्यात अनेक लोकं गंभीर जखमी झालेले आहेत. त्यात काही महिलांचाही समावेश आहे. झालेल्या या घटनेबद्दल मी आंदोलकांची माफी मागतो. यावेळी फडणवीसांनी मराठा आरक्षणप्रश्नी काही माजी मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र डागले. तसेच, विरोध मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला.

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार; प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून निर्देश

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. मराठवाड्यातले महसूल आणि शैक्षणिक रेकॉर्ड तपासण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या समितीकडे मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातून कुणबी समाजाची माहिती संकलित झाली आहे. याशिवाय, हैद्राबाद इथून निझामाचे जुने रेकॉर्ड तातडीने तपासण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी बैठकीत दिली. कुणबी नोंद असलेल्यांची वंशावळी तपासण्यात येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, युती शासन सत्तेवर आल्यानंतर आम्ही युवकांना नोकर्‍या, शिक्षण, शिष्यवृत्ती तसंच उद्योग व्यवसायांसाठी कर्ज, आर्थिक सहाय या माध्यमातून मदत केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु असतांना कुणीही राजकीय स्वार्थासाठी समाजाला भडकावू नये, असे मुख्यमंत्री या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मराठा आंदोलनात झालेली ती दगडफेक भिडेंच्या कार्यकर्त्यांकडून; समन्वयकांचा गंभीर आरोप

मराठा आंदोलनात उद्रेक करणारे हे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आहेत, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. जालन्यात आज मराठा समन्वयकांची एक बैठक झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. आजपर्यंत मराठा समाजानं शांततेत मोर्चे काढले. कधीच धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला, असा आरोप समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला. त्याचबरोबर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही यावेळी लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

BIG BREAKING | एक देश एक निवडणूक : माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीची घोषणा

Next Post

जालना घटनेच्या निषेधार्थ कडेगावमध्ये मराठा समाज आक्रमक…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जालना घटनेच्या निषेधार्थ कडेगावमध्ये मराठा समाज आक्रमक…

जालना घटनेच्या निषेधार्थ कडेगावमध्ये मराठा समाज आक्रमक...

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

by Admin
June 3, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विवाहितेला तिच्या मुलासह सांभाळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group