• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जालना घटनेच्या निषेधार्थ कडेगावमध्ये मराठा समाज आक्रमक…

प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Admin by Admin
September 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जालना घटनेच्या निषेधार्थ कडेगावमध्ये मराठा समाज आक्रमक…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव :- जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यावर पोलिसांकडून झालेल्या मारहानीच्या निषेधार्थ कडेगाव तालुक्यातील मराठा समाज आज आक्रमक झालेला पहावयास मिळाला.एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच, जालना घटनेचा जाहीर निषेध असो, अशा घोषणाबाजी करीत सकल मराठा समाजाच्यावतीने कडेगांव प्रांताधिकारी कार्यालावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो मराठा बांधव उपस्थीत होते. या शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देत कडेगांव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. कडेगांव शहरासह तालुक्यातील मराठा बांधव आक्रमक झाले. जालना घटनेच्या निषेधार्थ शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज मंगळवारी दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सकल मराठा समाज कडेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाला व येथून मोर्चास सुरुवात झाली..

भगवा झेंडा हातात घेवून व भगव्या टोप्या परिधान करीत मराठा बांधवांनी मोर्चास आगेकूच केली. जालना घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तर काळ्या फिती दंडावर बांधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचताच आक्रमक झालेले अनेक मराठा बांधव व भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला तहसीलदार अजित शेलार यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | अखेर ‘माफी’नामा..!

Next Post

मोठी ब्रेकिंग ! महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला, पाहा काय म्हटलंय शासन निर्णयात?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

मोठी ब्रेकिंग ! महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला, पाहा काय म्हटलंय शासन निर्णयात?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group