Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकजण ताब्यात

Admin by Admin
August 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकजण ताब्यात

 

हरीण संवर्गातील प्राण्याच्या तोंडाच्या हाडासहीत दोन शिंगांची विना परवाना तस्करी करणाऱ्या एकास पलूस पोलिसांनी (दि.२६) दुपारी ३ च्या सुमारास अटक केली. रोहीत बाबूराव कांबळे, (वय ३३, रा.शिरशिंगे – कोयना वसाहत, पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोयना वसाहत पलूस येथे संशयित आरोपी कांबळे राहतो. तो येथील बंद अवस्थेत असलेल्या शाळेच्या गेट समोरील मोकळ्या जागेत हरीण जातीच्या वन्य प्राण्याची तोंडाच्या हाडासहित शिंगाची विक्री करणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या पथकाने आज येथे छापा टाकला.

त्यावेळी कांबळे तस्करी करताना आढळून आला. त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची एका हरीण संवर्गातील वन्य प्राण्याच्या दात नसलेल्या तोंडाच्या १४ इंच लांब व ६ इंच रुंद फुटलेल्या अवस्थेतील हाडासहीत काळपट पांढरे रंगाचे प्रत्येकी ३१ इंच लांबीचे टोकदार व निमूळते असलेली दोन शिंगे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक केली असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, दिलीप गोरे, प्रवीण मलमे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री दूधाळे करत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | साताऱ्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील जयसिंगपूरचे तिघे ठार

Next Post

Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून “त्या’चे आयुष्य केले बरबाद..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून “त्या’चे आयुष्य केले बरबाद..!

Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून "त्या'चे आयुष्य केले बरबाद..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014