• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | साताऱ्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील जयसिंगपूरचे तिघे ठार

Admin by Admin
August 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | साताऱ्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील जयसिंगपूरचे तिघे ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या तवेरा गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच घरातील तीन जण ठार झाले.हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ झाला.

निखिल श्रीकांत सवाखंडे (वय 30),प्रियांका निखिल सवाखंडे (32),शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (63, सर्व रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील लोकांची नावे आहेत. इतर जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे तवेरा गाडीतून निघाले होते.

साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक तवेरा गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या गाडीत प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. आणि इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये तवेरा गाडीचा चक्काचूर झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नाही.

Previous Post

कडेगाव महसूल प्रशासनाचा कारभार म्हणजे “म्होरीला बोळा आणि दरवाजा मोकळा..!”

Next Post

पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकजण ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकजण ताब्यात

पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकजण ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group