• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून “त्या’चे आयुष्य केले बरबाद..!

Admin by Admin
August 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
0
Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून “त्या’चे आयुष्य केले बरबाद..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

धुळा कोंडीबा कोळेकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपींनी कवठेमहांकाळ शहरातील एसटी स्टँडवर धारदार शस्त्रांनी वार करत धुळा कोळेकर याची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर आता सांगली पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातील एका महाविद्यालयात धुळा कोळेकर या तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. त्यामुळं सूडाच्या भावनेने पेटलेल्या आरोपींनी शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी स्टँडवर उभा असलेल्या धुळा कोळेकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी चाकू, कोयता आणि अन्य धारदार शस्त्रांनी वार करत धुळाला जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली आहे. एकमेकांकडे रागाने बघितल्यामुळं धुळाची हत्या करण्यात आल्याचा संशय मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दीड महिन्यांपूर्वी धुळा कोळेकर याचा कॉलेजमधील काही तरुणांशी वाद झाला होता. परंतु दररोज सर्वजण एकमेकांसमोरून जात असल्याने वाद आणखी पेटण्याची शक्यता होती. त्यातच खुन्नस दिल्याने आरोपींनी धुळा कोळेकर याची हत्या केल्याने कवठेमहांकाळ शहरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

पलूसमध्ये हरणाच्या शिंगाची तस्करी; एकजण ताब्यात

Next Post

पोरांनो, कामाला लागा, आरोग्य विभागात तब्बल ११ हजार जागांची भरती!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोरांनो, कामाला लागा, आरोग्य विभागात तब्बल ११ हजार जागांची भरती!

पोरांनो, कामाला लागा, आरोग्य विभागात तब्बल ११ हजार जागांची भरती!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group