• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | अल्पवयीन मुलीची पुण्यात प्रसूती, बालविवाहाचा भांडाफोड..

Admin by Admin
April 6, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | अल्पवयीन मुलीची पुण्यात प्रसूती, बालविवाहाचा भांडाफोड..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : मृत बाळ जन्माला आल्यानंतर बालविवाहाचा (Child Marriage) धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

यानंतर अल्पवयीन मुलीसह तिचे आई, वडील, पती, सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याचा पतीवर आरोप आहे. सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) बाल विवाहाची घटना समोर आली आहे. लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेल्या या मुलीची पुण्यातील एका रुग्णालयात प्रसुती झाली असता मृत बाळ जन्माला (Stillborn Baby) आले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह माण तालुक्यातील देवापूर येथील समाधान चव्हाण याच्याशी 28 एप्रिल 2021 रोजी झाला होता. मुलीची आई आणि वडील यांनी मुलगी अल्पवयीन असतानाही समाधान चव्हाण याच्याशी लग्न लावून दिले होते.

पुण्यात स्थायिक मुलीची प्रसुती

लग्नानंतर मुलगी आणि तिचा पती पुणे येथे राहण्यास गेले होते. लग्न झाल्यानंतर अल्पवयीन असतानाही समाधान याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली होती.

कुटुंबातील पाच जणांविरोधात गुन्हा

दरम्यान तिची पुणे येथील रुग्णालयात प्रसुती झाली असता मृत बाळ जन्माला आले होते. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती, सासू सासरे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

Previous Post

“राऊंतांना चपलेनं..” ईडी कारवाई नंतर नितेश राणेंचा घणाघात

Next Post

अप्पर तहसील ‘लाचलुचपत’ च्या रडारवर…! ‘पावती- रॉयल्टी नावाला अन उपसा गावाला..?’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अप्पर तहसील ‘लाचलुचपत’ च्या रडारवर…! ‘पावती- रॉयल्टी नावाला अन उपसा गावाला..?’

अप्पर तहसील 'लाचलुचपत' च्या रडारवर...! 'पावती- रॉयल्टी नावाला अन उपसा गावाला..?'

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group