• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | मॉर्निंग वॉकला जाताना कारच्या धडकेत इसम जागीच ठार ; धडक दिलेल्या कारमध्ये अवैध दारुचे बॉक्स..?

Admin by Admin
August 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | मॉर्निंग वॉकला जाताना कारच्या धडकेत इसम जागीच ठार ; धडक दिलेल्या कारमध्ये अवैध दारुचे बॉक्स..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. संदेश आत्माराम दंडवते (रा.हिंगणगाव खुर्द, वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २३) सकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत अशोक राजाराम दंडवते यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली. कडेगाव पोलिसांनी कार चालक राहुल तात्यासो थोरात (रा.सोनसळ, ता.कडेगाव) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हिंगणगाव खुर्द येथील संदेश दंडवते हे नेहमी मित्रांसोबत मधल्या डोंगराई रस्त्याला मॉर्निंग वॉकला जात होते. ते गावातून आपल्या मोटार सायकलवरुन जायचे. ही मोटारसायकल डोंगराई रस्त्याच्या पायथ्याला लावून तेथून मित्रमंडळीसोबत डोंगरावर मॉर्निंग वॉकला जात होते.

नेहमीप्रमाणे ते आज (दि. २३) पहाटे साडे सहाच्यापूर्वी घरातून आपल्या मोटारसायकलवरुन (एम.एच. 10 सी.पी. 3666) निघाले होते. यावेळी ते तडसर-कडेपूर व हिंगणगाव खुर्द-डोंगराई डोंगर या दोन्ही रस्त्यावरील चौकात पोहोचले. दरम्यान तडसरहून कडेपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कारने (एम.एच 11 एच 3054) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार संदेश दंडवते यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेल्या कारमध्ये (एम.एच.11.एच.3054) अवैध दारुचे बॉक्स आढळून आले.

अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील संदेश दंडवते यांना वाहनातून उपचारासाठी कऱ्हाड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास कडेगाव पोलीस करीत आहेत.

Previous Post

कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना महिला पोलिसांकडून ‘प्रसाद’, तरुणाच्या थेट श्रीमुखात लगावली

Next Post

मोठ्या दिलाचा माणूस असलेला संदेश बापू आपल्याला सोडून गेला.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठ्या दिलाचा माणूस असलेला संदेश बापू आपल्याला सोडून गेला.

मोठ्या दिलाचा माणूस असलेला संदेश बापू आपल्याला सोडून गेला.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group