• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली पोलीस | बापरे..! महिला पोलिसांपासून सावध; आता फक्त कार्यालयीन काम नाही, तर थेट मैदानात..! ३२ देशी दारूच्या बाटल्यांसह गावठी दारू जप्त.

उमदी पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप शिंदे व टिमच्या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारांच्यात भय ; अवैध धंदेवाल्यांची केली जात नाही हयगय..!

Admin by Admin
August 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
सांगली पोलीस | बापरे..! महिला पोलिसांपासून सावध; आता फक्त कार्यालयीन काम नाही, तर थेट मैदानात..! ३२ देशी दारूच्या बाटल्यांसह गावठी दारू जप्त.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या प्रतिनिधी / जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बांलगाव व मरबगी येथील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी एपीआय संदीप शिंदे यांनी कारवाईचा रोज धडाका सुरू केलाय. उमदी पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होतंय. कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबतच आता महिला कर्मचारीही मैदानात उतरल्यात. महिला पोलीस नाईक जान्हवी शिवानंद राणे, पुजा संजय घार्गे,अंमलदार रेणुका कुमरे, छाया बाबर यांनी अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतलाय. छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती घेवून कारवाई करण्यासाठी वरिष्ठांनी सांगितले होते.

यस सर..! “हम भी किसीसे कम नही” हे दाखवून देत मरबगी येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या यादबी चाँदसाब नदाफ, सुवर्णा लंकप्पा सोनकनळ्ळी व बांलगाव येथील चंद्रमा रेवण्णाप्पा कांबळे यांना ताब्यात घेत देशी दारूच्या ३२ बाटल्यांसह गावठी दारू पकडून मोठी कारवाई केली आहे.

नेहमीच कार्यालयीन व कमी जबाबदारीची कामे महिला पोलीस अंमलदार यांना दिली जातात. परंतु सांगली पोलीस दलातील महिला अंमलदारांनी कोणाचीही मदत न घेता स्वतः कारवाई करून त्या सक्षम आहेत हे दाखवून दिलंय.

धाडसी महिला पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेत मात्र समाधान व्यक्त होतेय. उमदी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गांजावरील मोठी कारवाई करुन आपल्या अनोख्या व पोलीसी खाक्याची झलक दाखवून दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी महिला पोलिसांचे पथक तयार करून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट महिला पोलिसांनाच मैदानात उतरत महाराष्ट्र पोलीस दलात एक वेगळेपण दाखवून दिलय. यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. “ये तो ट्रेलर है पिक्चर अभि बाकी है..!” असाच इशारा दिला असल्याचे दिसून येते.

पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्या संकल्पनेतून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न असल्याचे उमदी पोलिसांच्या कामगिरीतून दिसून येत आहे.

Previous Post

“कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी मरण पत्करू पण मागे हटणार नाही” : हरिदास लेंगरे

Next Post

हा पत्ता माहीत आहे का ? डिलीव्हरी बॉयने प्रश्न विचारताच भडकली महिला, त्यानंतर तिने असं केलं…वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले

हा पत्ता माहीत आहे का ? डिलीव्हरी बॉयने प्रश्न विचारताच भडकली महिला, त्यानंतर तिने असं केलं...वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group