• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी मरण पत्करू पण मागे हटणार नाही” : हरिदास लेंगरे

Admin by Admin
August 22, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
“कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी मरण पत्करू पण मागे हटणार नाही” : हरिदास लेंगरे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विजयनगर परिसरातील यशवंतराव होळकर चौक – चाणक्य चौक मार्गावर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यासह माथाडी कामगार युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता . मेळाव्यामध्ये कामगार बंधूंना मार्गदर्शन करताना लेंगरे म्हणालेे.

“भांडवलदार – ठेकेदार हे कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. परंतु, राज्य सरकारला आणि व्यावसायिकांना मोठं करण्यामध्ये गिरणी कामगार, माथाडी कामगारांचा मोठा वाटा आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी कामगारच लढला. कोरोनाच्या काळात देखील कामगार वर्गच अग्रेसर होता. म्हणजे या देशासाठी सर्वात जास्त योगदान कामगारांचे व शेतकऱ्यांचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु काही घटकांना खऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे, म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी संघटनेची स्थापना केली.

कामगारांना कष्टकऱ्यांना गरिबांना शेतकऱ्यांना खऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. त्यासाठी संघर्ष करायला पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय फुकट काहीच मिळत नाही.

“असंघटित क्षेत्रातील गोरगरीब कामगारांना घेऊन महाराष्ट्रात मोठा लढा उभारू, आयुष्यभर कामगार, शोषित, वंचित या घटकांसाठी संघर्ष करत राहू, वेळप्रसंगी मरण पत्करू परंतु मागे हटणार नाही.” असा निर्धार हरिदास लेंगरे यांनी केला.

कामगार मेळाव्यानंतर माजी सैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी माजी सैनिक ज्ञानेश्वर जाधव, दादासो साळुंखे, गजानन कोळेकर, संभाजी जाधव, प्रकाश पाटील, कमलाकर बने,जिल्हा अध्यक्ष पांडुरंग सरगर, संयुक्त सरचिटणीस प्रदीप शिंदे, विलास काळे, राहुल दुधाळ,राजाराम मेटकरी, अनिकेत खांडेकर, प्रकाश टिळे, भीमराव हाके, अरुण देवकते, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कडेगांव तालुक्यातील येडे गांव होणार डिजीटल डिटॉक्स

Next Post

सांगली पोलीस | बापरे..! महिला पोलिसांपासून सावध; आता फक्त कार्यालयीन काम नाही, तर थेट मैदानात..! ३२ देशी दारूच्या बाटल्यांसह गावठी दारू जप्त.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली पोलीस | बापरे..! महिला पोलिसांपासून सावध; आता फक्त कार्यालयीन काम नाही, तर थेट मैदानात..! ३२ देशी दारूच्या बाटल्यांसह गावठी दारू जप्त.

सांगली पोलीस | बापरे..! महिला पोलिसांपासून सावध; आता फक्त कार्यालयीन काम नाही, तर थेट मैदानात..! ३२ देशी दारूच्या बाटल्यांसह गावठी दारू जप्त.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group