• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | निवडणुकांबाबतीत महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं..

Admin by Admin
August 20, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | निवडणुकांबाबतीत महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितलं..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्याकडे पांढऱ्या कपड्यांमधील टगे असल्याचा उल्लेख केला.

पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वसामान्य माणूस असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जानकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली.त्यानंतर त्यांनी विठा येथे पत्रकारांशी संवाद साधला. जानकर म्हणाले, पक्षवाढी प्रमाणे भाजपची गुर्मीही वाढली असून देवेंद्र फडणवीसांची भाजप लवकरच गुंडाळून जाईल. तर गावागावातील चष्मा व पांढरे कपडे घालून फिरणारे गावातील टगे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर गेले आहेत. कॉमन मॅन हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सोबत आहे.

तसेच आगामी निवडणुकांमध्ये आपण कोणाबरोबरही जाणार नाही. स्वबळावरच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू आहे. सांगलीची लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केला आहे. महादेव जानकर यांनी यावेळी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. छोटे पक्ष संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा मोठ्या पक्ष विस्कळीत झाले आहेत. त्याचा फायदा इतर लहान पक्षांनाही होणार आहे. लहान पक्षांना चांगले दिवस येणार आहेत. पण कुणाचे वाटोळे व्हावे आणि कुणाचे चांगले (NCP) व्हावे, असे म्हणण्याचा आम्हालाही अधिकार नाही, असही जानकरांनी स्पष्ट केलं.

जानकर म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. कांद्याचे आणि मक्याचे दर कोसळले आहेत. तेलंगणात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जात आहेत. तशा सवलती महाराष्ट्रातही मिळाव्यात, यासाठी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचही जानकरांनी नमुद केलं.

Previous Post

बिग ब्रेकिंग | 🔥सांगली पोलिसांना मोठा दणका : “याप्रकरणी” पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; वाचा सविस्तर..!

Next Post

कडेगांव तालुक्यातील येडे गांव होणार डिजीटल डिटॉक्स

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगांव तालुक्यातील येडे गांव होणार डिजीटल डिटॉक्स

कडेगांव तालुक्यातील येडे गांव होणार डिजीटल डिटॉक्स

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group