• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सावर्डे कडकडीत बंद ; प्रदीप माने यांच्याविरोधातील खोट्या गुन्ह्याचा निषेध : सगळ्याच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

Admin by Admin
August 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येथील भूमि अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभाराला वैतागून शिवसेनेचे तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे, शिपाई दत्ता जगताप व बोगस व्यक्ती बाळू लोखंडे यांचे थोबाड फोडले होते. या प्रकरणी माने यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करताना अतिशय धादांत खोटे आरोप लावण्यात आले आहेत. या विरोधात सावर्डे (ता. तासगाव) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. खोट्या गुन्ह्याविरोधात आज सावर्डे ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. तर या पुढील काळात सर्वच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची पिळवणूक होते. लोकांचे एकही काम वेळेवर होत नाही. एका कामासाठी अनेक हेलपाटे घालावे लागतात. या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. येथील मस्तवाल अधिकारी व कर्मचारी लोकांच्या कामाची दखल घेत नाहीत.

या कारभारात सुधारणा करण्याची सूचना शिवसेनेचे प्रदीप माने यांनी दिली होती. मात्र तरीही या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या माने यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयात मुख्यालय सहाय्यक शिरढोणे, शिपाई जगताप व शासकीय कागदपत्रे हाताळणारा बोगस व्यक्ती लोखंडे यांचे थोबाड रंगवले. माने यांनी केलेले हे कृत्य म्हणजे सर्वसामान्यांची भावना होती. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांची ही कृती होती. त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नव्हता.

मात्र आपल्यावर अन्याय झाला अशी आवई उठवत सर्व शासकीय पिलावळ एकत्रित आली. शिरढोणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माने यांच्यासह अन्य दोघांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या फिर्यादीतील मजकूर अतिशय खोटा आहे, असा आरोप सावर्डे ग्रामस्थांनी केला आहे. जो प्रकार घडलाच नाही त्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या सावर्डे ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला. गावातील आपत्कालीन व्यवस्था वगळता सर्व व्यवहार बंद होते.

Previous Post

‘बॉम्ब घेऊन तयार राहा, आलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करा’, यवतमाळच्या माजी आमदाराचा अजब सल्ला..

Next Post

पत्रकार हल्ल्याचा वचपा काढणार ; नवा सर्वे : ‘शिंदे-फडणवीस-पवार’ ट्रिपल इंजिन होणार फेल?; काँग्रेस हवेत…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्रकार हल्ल्याचा वचपा काढणार ; नवा सर्वे : ‘शिंदे-फडणवीस-पवार’ ट्रिपल इंजिन होणार फेल?; काँग्रेस हवेत…

पत्रकार हल्ल्याचा वचपा काढणार ; नवा सर्वे : 'शिंदे-फडणवीस-पवार' ट्रिपल इंजिन होणार फेल?; काँग्रेस हवेत...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group