• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पत्रकार हल्ल्याचा वचपा काढणार ; नवा सर्वे : ‘शिंदे-फडणवीस-पवार’ ट्रिपल इंजिन होणार फेल?; काँग्रेस हवेत…

Admin by Admin
August 20, 2023
in मंत्रालय, राजकीय, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
पत्रकार हल्ल्याचा वचपा काढणार ; नवा सर्वे : ‘शिंदे-फडणवीस-पवार’ ट्रिपल इंजिन होणार फेल?; काँग्रेस हवेत…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (खबऱ्या प्रतिनिधी) : राज्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन ४८ जागांवरील ग्राऊंड रिॲलिटीचा सर्वे काँग्रेसने केला असून, त्‍याद्वारे दावा करण्यात आला आहे, की शिंदे-फडणवीस-पवार अशी तिहेरी मोट बांधूनही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा निष्कर्ष सर्वेच्‍या आधारे काढण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतून शिंदे गट फोडला व राज्‍यात सरकार स्थापन केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला आहे. असे असूनही अपेक्षित यश मात्र भाजपाला मिळणारच नाही, असे सर्वेतून समोर आले आहे. सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हवेत असून, ते म्‍हणाले, की सर्वेत ४८ मतदारसंघांत जाऊन तेथील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करू. सर्व पातळ्यांवरून आम्‍ही भाजपला उखडून फेकणार आहोत, असे नाना पटोले म्‍हणाले.

काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही. ते मोठे नेते आहेत. निर्णय घेण्यास सक्षम आहेत. इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असे पटोले म्‍हणाले. मोदी सरकार देशातील आर्थिक स्थिती नीट हाताळू शकले नाहीत. त्‍यामुळेच महागाई वाढली आहे. मात्र महागाईचे खापर मात्र परदेशावर फोडून मोदींनी हात वर केले आहेत. मोदी पुन्हा येणार अशी घोषणा करतात. मात्र लोकशाहीत असा अहंकार चालत नाही, असे पटोले म्हणाले.

Previous Post

सावर्डे कडकडीत बंद ; प्रदीप माने यांच्याविरोधातील खोट्या गुन्ह्याचा निषेध : सगळ्याच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

Next Post

बिग ब्रेकिंग | 🔥सांगली पोलिसांना मोठा दणका : “याप्रकरणी” पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग | 🔥सांगली पोलिसांना मोठा दणका : “याप्रकरणी” पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; वाचा सविस्तर..!

बिग ब्रेकिंग | 🔥सांगली पोलिसांना मोठा दणका : "याप्रकरणी" पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ; वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group