• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साऊंडवाल्यानो नियमांचे पालन करा ; पोलीस अधीक्षकांचा सज्जड दम

Admin by Admin
August 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
साऊंडवाल्यानो नियमांचे पालन करा ; पोलीस अधीक्षकांचा सज्जड दम
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात डॉल्बी मालक आणि चालकांनी नियमांचे पालन करावे. मिरवणुकीत कायद्याने घालून दिलेल्या आवाजाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टिम चालक-मालक आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते.

गणेशोत्सव 2023 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून डॉल्बी साऊंड सिस्टिम मालक चालकांची अलंकार हॉल मध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव 2023 च्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी साऊंड सिस्टीम असोसिएशनचे अध्यक्ष मुनीद मुल्ला यांच्यासह अनेक मालक-चालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी डॉल्बी लावाल तर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. लेझर लाईटमुळे ज्या दुर्घटना घडतात त्याची जबाबदारी कोणाची? असं म्हणत डॉल्बीचा वापर करू नये असे आवाहन महेंद्र पंडित यांनी केले. कोल्हापुराला साजेसा गणेशोत्सव करून पोलिसांशी कटुता घेऊ नका आणि आम्हालाही कटुता घेण्यास भाग पाडू नका असा थेट इशाराच डॉल्बी चालकांना पोलीस अधीक्षकांनी दिला.

Previous Post

कोल्हापूर | देशभूषण हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

सर्वात मोठी बातमी, मुंबईतल्या बैठकीआधीच ‘इंडिया’ आघाडीत मोठी फूट?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सर्वात मोठी बातमी, मुंबईतल्या बैठकीआधीच ‘इंडिया’ आघाडीत मोठी फूट?

सर्वात मोठी बातमी, मुंबईतल्या बैठकीआधीच ‘इंडिया’ आघाडीत मोठी फूट?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group