• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी : गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!

Admin by Admin
August 16, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी : गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कवठेमहांकाळ येथील आनंद सागर शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी मिनी बस काल, मंगळवारी सकाळी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी (नरसिंहगाव) जवळ उलटली.

या अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली.

गोपनीय खबऱ्याने काही दिवसांपूर्वीच केले होते शाळेच्या विद्यार्थी वाहतुकीबाबत सडेतोड वार्तांकन..!

विभावरी विनायक पोतदार, विकास विनायक पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी अभिजीत सगरे, समृद्धी सावंता माळी, अनन्या प्रदीप पवार अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी अपघाताची दखल गांभीर्याने घेतली असून, शाळा व्यवस्थापनावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. बसचा चालकाला डोळे आले होते तरी देखील तो कामावर आल्यामुळे हा अपघात घडला.

कवठेमहांकाळ येथे आनंद सागर पब्लिक स्कूल आहे. काल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी लवकर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस क्रमांक MH-12-FC-9113 रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर, लांडगेवाडी जवळ उलटली. यावेळी घटनास्थळावरील नागरिकांनी व वाहनधारकांनी जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांचेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बस चालकाची अवस्था अत्यंत बिकट आहे.

आरटीओ व पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना देखील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी बेकायदेशीरपणे वाहने वापरली जात आहेत. अशी वाहने वापरणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालक व नागरिक करीत आहेत.

Previous Post

खबऱ्या ब्रेकिंगच्या लाईव्ह अपडेटस् – ४ मोठ्या बातम्या…वाचा सविस्तर.अजितदादांना मुख्यमंत्रीपद.? मोदींची अट..!

Next Post

कोल्हापूर | देशभूषण हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!

कोल्हापूर | देशभूषण हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group