• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या राजकारणातील ६ मोठ्या बातम्या..! वाचा सविस्तर..

Admin by Admin
August 13, 2023
in मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
महाराष्ट्राच्या राजकारणातील ६ मोठ्या बातम्या..! वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

🛑 ठाकरे गटातील 2 खासदार आणि 8 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार : खासदार प्रतापराव जाधव

बुलडाणा | उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार आणि 8 आमदार हे लकरच शिवसेनेत येणार आहेत, असा दावा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

🛑 सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. शरद पवार यांनी पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले आहेत.

🛑 दीपक केसरकर ठाण्यातील रुग्णालयात..

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पोहचले आहेत. एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंत्री केसरकर यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेऊन याविषयी भूमिका मांडणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

🛑 शिंदे गटातील 15 आमदार नाराज..

शिंदे गटातील 15 आमदार नाराज असल्याचा दावा राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी केला. हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटात येण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

🛑 मुख्यमंत्री आराम करत आहेत – संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आराम करत आहे. त्यासाठी ते गावी गेले आहे. मुख्यमंत्री आराम करण्यासाठी झाला की लोकांची कामे करण्यासाठी झालात? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

🛑 २०१९ मध्ये शिंदे मुख्यमंत्री होणार होते- संजय राऊत..

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते. परंतु भाजपला ते मुख्यमंत्री नको आहे. २०१९ ला सत्तेचे ५०-५० टक्के वाटप होईल, असे अमित शाह यांनी म्हटले होते. परंतु ते झाले नाही.

Previous Post

मिरजेत तिरंगा रॅली, शहरातील शंभरफुट उंच तिरंगा ध्वजाचे स्वातंत्र्यदिनी होणार लोकार्पण ..

Next Post

Section 377: अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचं कलम वगळलं! आरोपी पुरुषांसाठी नाही शिक्षेची तरतूद..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Section 377: अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचं कलम वगळलं! आरोपी पुरुषांसाठी नाही शिक्षेची तरतूद..

Section 377: अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचं कलम वगळलं! आरोपी पुरुषांसाठी नाही शिक्षेची तरतूद..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group