• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

डफळापूर येथील मुलींच्या शाळेमध्ये अज्ञातांकडून तोडफोड; जत पोलिसात फिर्याद दाखल

Admin by Admin
August 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
डफळापूर येथील मुलींच्या शाळेमध्ये अज्ञातांकडून तोडफोड; जत पोलिसात फिर्याद दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जत (प्रतिनिधी ) : डफळापूर (ता. जत) येथील पोलिस चौकी लगत असणाऱ्या जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोनमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गेल्या दीड महिन्यात तीन वेळा शाळेची तोडफोड करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञातांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू असून मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत मॉडेल स्कूल करण्यासाठी डफळापूर येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोनची निवड करण्यात आली असून तिथे आतापर्यंत ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडील विषय तज्ज्ञ सुरेंद्र सरनाईक, केंद्रप्रमुख रतन जगताप, वरिष्ठ मुख्याध्यापक अरविंद बंडगर व शाळा व्यवस्थापन समितींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. मॉडर्न स्कूल अंतर्गत येथे शाळेचे सुशोभीकरण, नवीन प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे साहित्य आदी सुधारणा करण्यात आलेली आहे. पटसंख्याही वाढलेली आहे. पहिली ते सातवी वर्गात दोनशे विद्यार्थी शिकत आहेत.

डफळापूर पोलिस चौकीसाठी एक सहायक फौजदार, हवालदार, एक कॉन्स्टेबल अशी नेमणूक आहे, परंतु या पोलिस चौकीमध्ये कोण फिरकत नसल्याचे दिसते. पोलिस चौकीला लागून असलेल्या मुलींच्या शाळेमध्ये दीड महिन्यात तीन वेळा तोडफोड झाली. तरीही पोलिस प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या शाळेत गेल्या दीड महिन्यात अज्ञात व्यक्तीकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञातांनी दीड महिन्यात शाळेची दरवाजे, खिडक्यांची व शालेय साहित्यांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला आहे, झाडांचेही नुकसान करण्यात आले आहे. या घटनेबाबत शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक अरविंद बंडगर यांनी जत पोलिसात फिर्याद नोंद केली आहे.

Previous Post

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे…

Next Post

सांगली | जुनी पेन्शन लागू करण्यासह खासगीकरण रद्द करा, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | जुनी पेन्शन लागू करण्यासह खासगीकरण रद्द करा, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

सांगली | जुनी पेन्शन लागू करण्यासह खासगीकरण रद्द करा, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group