• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे…

Admin by Admin
August 7, 2023
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतून वर्सोवाच्या दिशेने घरी जाताना चेहऱ्याला कपडा बांधून आलेल्या काही अज्ञात इसमांनी बॅटने गाडीची काच फोडली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप पेवेकर यांनी केलाय. संबंधित घटनेनंतर अल्ताफ पेवेकर यांनी पोलिसात धाव घेतली.

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. मुंबईत सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेना दोन पक्षात विभागली गेली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. असं असताना आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अल्ताफ यांनी ठाकरे गटावर आरोप केलाय. त्यामुळे याप्रकरणी काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे पोलीस तपासात सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती.

Previous Post

मोठ्या बातम्या : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर..! वाचा सविस्तर.

Next Post

डफळापूर येथील मुलींच्या शाळेमध्ये अज्ञातांकडून तोडफोड; जत पोलिसात फिर्याद दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
डफळापूर येथील मुलींच्या शाळेमध्ये अज्ञातांकडून तोडफोड; जत पोलिसात फिर्याद दाखल

डफळापूर येथील मुलींच्या शाळेमध्ये अज्ञातांकडून तोडफोड; जत पोलिसात फिर्याद दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group