• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठ्या बातम्या : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर..! वाचा सविस्तर.

Admin by Admin
August 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, विशेष, शैक्षणिक, शोध पत्रकारिता, सामाजिक
1 min read
0
दप्तर दिरंगाई प्रकरणी “या” अधिकाऱ्याला सांगली जिल्हा परिषदेने केले निलंबित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पैशाच्या बदल्यात नोकरीचं अमिष भोवलं, महिला अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक..

पुणे | राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा अमिष दाखवलं, पैसेही घेतले, मात्र नोकरी न लावता फसवणूक केली. हा संपूर्ण प्रकार केलाय शिक्षण विभागातील एका मोठ्या महिला अधिकाऱ्यांनं. शैलजा दराडे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. शैलजा दराडे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त होत्या. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर आता शैलजा दराडे यांना अटक करण्यात आलीय.

शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी घटनास्थळी दाखल..

कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून घटनेचा आढावा घेणे सुरू आहे. दुपारी वाई न्यायालयात घडली होती गोळीबाराची घटना. कुख्यात गुंडावर दोन जणांकडून गोळीबार करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

साताऱ्यात कुख्यात गुंडांवर न्यायालय परिसरात गोळीबार करणाऱ्यांना बेड्या

सातारा : वाई न्यायालय परिसरात दुपारी गोळीबार झाला होता. कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्या दिशेने गोळीबार झाला होता. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी नाही. वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला.

दोन फायर होऊनही नशिबाने कोणाला दुखापत झाली नाही. गोळीबार करणारे दोनजण ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणीत सातारा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गोळीबार का करण्यात आला? याची चौकशी सुरू केली आहे.

जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. इंडिया आघाडीची ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत बैठक बोलावण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील उद्धव ठाकरे यांची भेट घेत असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद | विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यात राडा..

औरंगाबादमधील डीपीडीसीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला. या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक झाले आणि मंचावरून उठून त्यांनी संताप व्यक्त केला. विरोधी आमदारांना निधी देत नसल्यामुळे अंबादास दानवे आक्रमक झाले. यावेळी संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात बाचाबाची झाली.

दिल्लीमध्ये भ्रष्टाचार मुक्त सरकारचा कारभार व्हावा हाच आमचा हेतू- अमित शहा..

राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. दिल्लीत भ्रष्टाचार मुक्त सरकारचा कारभार व्हावा हाच आमचा हेतू आहे. हे विधेयक आल्यानंतर आधीची जी परिस्थिती होती त्यात कोणताही बदल होणार नाही, असेही अमित शहा म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आज पुन्हा मोठे पक्षप्रवेश..

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांच्या विभागातील टागोर नगरमधील शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने गटप्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते आज रात्री 9 वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.

Previous Post

Rahul Gandhi Breaking: अखेर खासदारकी बहाल ! उद्या मोदी-राहुल गांधी आमनेसामने

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे…

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group