• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महिला कर्मचाऱ्यांना धमकी देणारा “तो” नगरसेवक कोण..?

Admin by Admin
August 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
महिला कर्मचाऱ्यांना धमकी देणारा “तो” नगरसेवक कोण..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शुक्रवारी महापालिकेच्या महासभेमध्ये प्रचंड गदारोळ पाहावयास मिळाला. यावेळी वादावादी झाली. नगरसेवकांमध्ये तुफान फटकेबाजी झाली. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढत गेल्या. यावेळेस विकास कामावरून सुरू असलेला वाद अरेरावीपर्यंत गेला. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी “मी मागासवर्गीय असल्याने मला टार्गेट केलं जात आहे” असा आरोप राष्ट्रवादीच्याच नगरसेवकावरती केला. तर संगीता हारगे यांनी आम्हाला ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून ब्लॅकमेल केल जात आहे. असा थेट आरोप नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यावरती केला.

तर याच महासभेमध्ये ठेकेदाराच्या नावावर एक नगरसेवक दलाली करत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वसूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला. यावर हा नगरसेवक कोण..? याची विचारणा इतर सदस्यांनी केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नगरसेवक नायकवडी असे नाव घेतले. मात्र काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी नगरसेविका वहिदा नाईकवडी या सभागृहात आहेत. त्यामुळे संबंधित नगरसेवकाचे पूर्ण नाव काय..? असा सवाल केला. यावर बागवान यांनी नगरसेविका नसून नगरसेवक असा उल्लेख कर्मचाऱ्यांनी केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळेस संबंधित नगरसेवकाकडून महिला कर्मचाऱ्यांना धमकी मिळत असल्याचाही आरोप कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनी केला. प्रसंगी महासभेसमोर आपल्या व्यथा मांडत असताना महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले.

Previous Post

प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनीच मोडली नियमावली ; दिवसा अवजड वाहतुकीस शहरात बंदी असताना ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीचे साहित्य घेवून ९८ चाकांचा कंटेनर बिनधास्तपणे शहरात घातला..?

Next Post

नेवरीत आज महसूल मेळाव्याचे आयोजन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नेवरीत आज महसूल मेळाव्याचे आयोजन

नेवरीत आज महसूल मेळाव्याचे आयोजन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group