• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका..

Admin by Admin
August 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यात पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. वेश्या व्यवसायासाठी फ्लॅट उपलब्ध करून देणारा संशयितासह अन्य एक एजंटाचा पोलिस शोध घेत आहेत. शहरातील अनेक हाॅटेल, लॉजवर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सुरूवातील डमी ग्राहक पाठवून याबाबतची खातरजमा करण्यात आली. यानंतर पथकाने तिथे जात ही कारवाई केली.

यात पाच महिलांची सुटका करण्यात आली. वेश्या व्यवसायासाठी फ्लॅट देणारा संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले तर हा अड्डा चालविणाऱ्या दोन एजंटांचा आता पोलिस शोध घेत आहेत. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार संशयितांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Previous Post

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होत म्हणाला…

Next Post

मिरज-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस सुरू

मिरज-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस सुरू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group