• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होत म्हणाला…

Admin by Admin
August 5, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होत म्हणाला…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरजेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शहरात बापानेच मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची माहिती समोर आली आहे.

व्यसनाधिन मुलाच्या बापाने कंटाळून क्रूरपणे त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरजेमध्ये उघडकीस आला आहे. खून करून निर्दयी बापाने कटरने मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून तलावात फेकल्याचीही माहिती मिळाली आहे. या प्रकरणी बापाला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे.

रोहित राजेंद्र हंडीफोडे,असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. मुलाच्या व्यसनाधिनतेला कंटाळून राजेंद्र हंडीफोडे (वय 50) याने हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिरज शहरातील सुभाष नगर येथे राहत असलेल्या राजेंद्र हंडीफोडे यांनी मुलगा रोहितचा कुऱ्हाडीने खून केला. त्यानंतर रोहितच्या मृतदेहाचे कटरने दोन तुकडे केले. यानंतर एक तुकडा शहरातल्या गणेश तलाव येथे टाकला आणि एक तुकडा गणेश तलावाच्या शेजारीत असणाऱ्या घरामध्ये लपवून ठेवला होता.

या खुनाच्या घटनेनंतर राजेंद्र हंडीफोडेने स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर होत मुलाच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर मिरज पोलिसांनी गणेश तलावातून रोहित हंडीफोड याच्या शरीराचा एक तुकडा बाहेर काढला आहे. तर दुसरा तुकडा त्याच्या घरात आढळून आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून खून करणाऱ्या पित्याला अटक करण्यात आली आहे. बापानेच मुलाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेने मिरज शहर हादरून गेले आहे.

दरम्यान, रोहित हंडीफोडे याला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. या व्यवसाधिनतेपायी रोहित कुटुंबाला प्रचंड त्रास देत होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्र हंडीफोडे यांनीच मुलाचा खून केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेत ७५४ जागांची नोकरभरती

Next Post

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
येडा झालाय “त्यो”…! तासगाव मधील पट्ट्याने गौतमी पाटीलसाठी काय केलंय बघा…!

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group