• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्हा परिषदेत ७५४ जागांची नोकरभरती

आजपासून ऑनलाईन प्रक्रिया, २५ ऑगस्ट शेवटची मुदत

Admin by Admin
August 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली जिल्हा परिषद गट बदलणार ; संख्या पुन्हा ६० वर जाणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली ( प्रतिनिधी): मागील पाच वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या तब्बल ७५४ जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया शनिवारपासून (दि. ५ ऑगष्ट) सुरु होत आहे. सरळ सेवा भरतीसाठी ५ ते २५ ऑगष्ट या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, सेवक, परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ट लिपीक, कनिष्ट अभियंतासह विविध पदांचा समावेश असून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याचे संकेत आहेत.

राज्य सरकारकडून ७५ हजार जागांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतही सुमारे ७५४ पदाची सरळ सेवेव्दारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील काही वर्षापासून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची अनेक पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय व विकास कामांसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नोकरभरतीकडे लक्ष लागले होते. अखेर शासनाकडून जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी भरती करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून ५ ऑगष्ट ते २५ ऑगष्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.

जिल्हा परिषदेतील सरळसेवा भरतीपात्र सतरा संवर्गातील विविध पदासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल. भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य पर्यवेक्षक ४ जागा, कंत्राटी ग्रामसेवक ५२, आरोग्य सेवक (पु.) हंगामी फवारणीमधून १६८, आरोग्य सेवक (पु.) १७, आरोग्य सेवक (म) ३६६, औषध निर्माण अधिकारी २३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) ३४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, बांधकाम) २६, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम, लघुपाटबंधारे) २३, कनिष्ठ आरेखक (बांधकाम) १, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका ९. पशुधन पर्यवेक्षक २२, विस्तार अधिकारी (कृषी) १, विस्तार अधिकारी (पंचायत) १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २ अशी एकूण सतरा संवर्गाची अंदाजे ७५४ पदाची भरती होणार आहे. ही भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. भरतीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय मधून ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Previous Post

Maharashtra Police Force : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल; 1960 नंतर पहिल्यांदाच रचना बदलली

Next Post

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होत म्हणाला…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होत म्हणाला…

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच हजर होत म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group