• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संभाजी भिडे आधुनिक शकुनी मामा : सचिन खरात

Admin by Admin
August 3, 2023
in राजकीय
1 min read
0
संभाजी भिडे आधुनिक शकुनी मामा : सचिन खरात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.ज्या प्रमाणे शकुनी मामा माथी भडकवण्याचे काम करायचा, तेच काम हे आधुनिक शकुनी मामा संभाजी भिडे करतायत” अशी टीका सचिन खरात यांनी भिडेंवर केली आहे .

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले , रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रालाच नाही, तर भारताला समानतेचा विचार दिला. पण तो समानतेचा विचार सांगण्याऐवजी संभाजी भिडे तरुणांची माथी भडकवण्याच काम करताना दिसतात. ज्या प्रमाणे शकुनी मामा माथी भडकवण्याचे काम करायचा, तेच काम हे आधुनिक शकुनी मामा संभाजी भिडे करतायत .आपल्या महाराष्ट्रात संभाजी भिडे सतत भडकाऊ विधान करताना दिसत आहेत. संभाजी भिडे शिव प्रतिष्ठान संघटनेच्या नावाखाली तरुणाची माथी भडकवण्याच काम राज्यात करताना दिसतात असेही सचिन खरात म्हणाले .

दरम्यान शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. संभाजी भिडे यांच्यावर जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेतही पडसाद उमटले.काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार या आमदारांनी सभागृहात संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

Previous Post

‘स्वाभिमानी’ वर रविकांत तुपकरांचा दावा?; राजू शेट्टींनी बोलावली तातडीची बैठक

Next Post

पंतप्रधान मोदी, फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीचे : रघुनाथदादा यांची टीका

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पंतप्रधान मोदी, फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीचे : रघुनाथदादा यांची टीका

पंतप्रधान मोदी, फडणवीस हे कत्तलखान्यात विकण्याच्या लायकीचे : रघुनाथदादा यांची टीका

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group