• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Pune Police MCOCA Action | गोळीबार करुन तरुणाला जखमी करणाऱ्या टेड्या सातपुते व त्याच्या इतर 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Admin by Admin
August 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Pune Police MCOCA Action | गोळीबार करुन तरुणाला जखमी करणाऱ्या टेड्या सातपुते व त्याच्या इतर 4 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे : खबऱ्या प्रतिनिधी | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करुन जखमी करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते याच्यासह त्याच्या इतर चार साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 42 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

फिर्यादी हे 17 जुलै रोजी रामनगर येथील जय भवानी चौकात त्यांच्या घरासमोरील रोडवर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्याद यांना बोलावून घेत शिवीगाळ करुन आज तुला खल्लासच करतो असे म्हणत त्यांच्यावर बंदूक रोखली. त्यावेळी फिर्यादी यांनी बंदुक हाताने वळवल्याने जमिनीवर गोळीबार झाला. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी फिर्यादी यांच्या कमरेला लागल्याने ते गंभीर जखमी झाली. अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 307,34 आर्म अॅक्ट महाराष्ट्र पोलीस अॅक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी हा गुन्हा पुर्ववैमनस्यासातून ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते (वय-23 रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) व वीर फकीरा युवराज कांबळे (वय-22 रा. शिवणे, पुणे) यांच्या सांगण्यावरुन पूर्वनियोजित कट रचून केल्याचे समजले. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात आयपीसी (IPC) 120 (ब) व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अॅक्टचे कलम वाढवण्यात आले.

याप्रकरणी ओंकार उर्फ टेड्या सातपुते याला अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर वीर कांबळे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपी सातपुते याने संघटीत टोळी तयार करुन खूनाचा प्रयत्न ,दरोडा गुन्हा करण्यासाठी कट रचणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गुन्हे वारंवार केले आहेत.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 42 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर ,पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे,पोलीस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कातुर्डे यांच्या पथकाने केली.

Previous Post

हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्यास सांगलीत अटक

Next Post

‘स्वाभिमानी’ वर रविकांत तुपकरांचा दावा?; राजू शेट्टींनी बोलावली तातडीची बैठक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘स्वाभिमानी’ वर रविकांत तुपकरांचा दावा?; राजू शेट्टींनी बोलावली तातडीची बैठक

‘स्वाभिमानी’ वर रविकांत तुपकरांचा दावा?; राजू शेट्टींनी बोलावली तातडीची बैठक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group