• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संभाजी भिडेंना आठ दिवसांत पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश

Admin by Admin
August 3, 2023
in क्राईम, राजकीय
1 min read
0
संभाजी भिडे यांना बेड्या ठोका, सहा महिने तरी त्यांना देशाच्या बाहेर ठेवा; सत्ताधारी पक्षातील आमदाराचं वक्तव्य
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्त्यव्य करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी करत विरोधकांनी विधीमंडळात गदारोळ घातला होता. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासाठी राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडेंना आठ दिवसात अमरावती पोलिसाकडे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी कि , शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राज्यातवातावरण तापलं आहे. भिडे यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे आठ दिवसात संभाजी भिडे अमरावती पोलिसांकडे हजर राहतात का? याकडे लक्ष लागलं आहे. याचबरोबर संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती अमरावती जिल्ह्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी २७ जुलै रोजी सायंकाळी एका जाहीर सभेत महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर महापुरुषांची बदनामी केली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना आज नोटीस जारी करण्यात आली आहे असून ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

Previous Post

जुन्या वादातून कोल्हापुरात तरुणावर चाकू हल्ला

Next Post

महसूल उत्पन्न हे जनतेच्या कल्याणासाठी : डॉ. राजा दयानिधी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महसूल उत्पन्न हे जनतेच्या कल्याणासाठी : डॉ. राजा दयानिधी

महसूल उत्पन्न हे जनतेच्या कल्याणासाठी : डॉ. राजा दयानिधी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group